ब्रेकींग : अज्ञातांनी कुंभमेळ्याला जाणाऱ्या रेल्वेवर फेकला दगड; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी निघालेली रेल्वे गाडी क्रमांक (१९०४५) सुरत छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस गाडी ही जळगाव स्टेशनवर आल्यानंतर दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास ही भुसावळकडे रवाना झाली त्यावेळी जळगाव स्टेशनपासून १ किलोमीटर अंतरावर अज्ञात समाज कंटकांनी एक दगड फेकल्याने बी-६ कोच मधील ३९ क्रमांकाच्या खिडकीचे काम फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती जळगाव आरपीएफ विभागाचे प्रभारी ज्ञानेश्वर पाटील यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली आहे.

याबबात अधिक माहिती अशी की, रविवारी १२ जानेवारी रेाजी महाकुंभ प्रयागराज ट्रेन क्रमांक (१९०४५) सुरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस ही सुरत येथून निघाली, रविवारी १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही रेल्वे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यानंत सव्वा तीन वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानक येथून निघून भुसावळकडे रवाना झाली. त्यावेळी रेल्वे स्टेशनच्या प्लटफार्म येथून १ किलोमिटर अंतरावर रेल्वे जात असतांना शिवाजी नगर भागातील एका समाज कंटकाने रेल्वेच्या दिशेने दगड फेकला. त्यामुळे रेल्वेच्या डब्बा क्रमांक बी-६ मधील सीट क्रमांक ३९च्या खिडकीचे काच फुटली. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या कोचमध्ये पाच मुले, सहा वृद्ध, १३ महिला आणि १२ पुरुष होते. हे सर्व सुरतचे भक्त होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त ट्रेनमधील 45टक्के लोक कुंभासाठी प्रयागराजला जात आहेत.

दरम्यान काही रेल्वेतील प्रवाशांनी ट्विटरवर व्हिडीओ अपलोड केला आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ही घटना घडल्यानंतर जळगाव रेल्वे स्टेशने आरपीएफ विभागाचे प्रभारी ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली आहे. दरम्यान रेल्वे पोलीसांनी भुसावळ रेल्वे पोलीसांशी संपर्क साधुन घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मुळात दगडफेक झाली नसून एका समाजकंटाकडून दगडफेकल्याने एक खिडकीचे काम फुटले आहे. यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाली पहा या गाडीतून प्रवास करण्याऱ्या व्यक्तीने याबाबत दिलेल्या माहितीचा व्हिडिओ.

Protected Content