जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथे सुरू झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी चोरटे सक्रीय होत तीन महिलांच्या मंगलपोत लांबविल्याची घटना मंगळवार ५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. या ठिकाणी संशयितरित्या फिरताना आढळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०ते २२महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेत तालुका पोलिसांकडे दिले.
जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथे मंगळवार, ५ डिसेंबरपासून श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सकाळपासून कथास्थळी जाण्यासाठी सर्वच मार्गावर मोठी गर्दी उसळली व दोन-दोन तास एकाच ठिकाणी वाहनधारक थांबून होते. शिवाय कथास्थळीदेखील मोठी गर्दी झाल्याने या गर्दीचा फायदा घेत हेमलता प्रकाश भावसार रा. वाघ नगर, जळगाव , सरोज पुरूषोत्तम जोशी रा. शिवाजी नगर, जळगाव आणि मंगलाबाई प्रकाश कोळी रा. नशिराबाद ता.जि.जळगाव या तीन महिलांच्या एकुण ९६ हजार रूपये किंमतीच्या सोन्याची मंगलपोत लांबविण्यात आल्या. सोनसाखळी चोरीसह चोरीच्या विचाराने संशयितरित्या काही महिला फिरत असल्याचे आढळून येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २० ते २२ महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांची रात्रीपर्यंत चौकशी सुरू होती. याप्रकरणी हेमलता प्रकाश भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात २० ते २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहे.
श्री महापुरण कथेत महिला चोरांची टोळी सक्रीय झाले असून भाविकांनी येतांना सोन्यासह मौल्यवान वस्तू घालू नये आणि सोबत मोजकेच पैसे ठेवावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी केले आहे.