मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शिवसेना आणि पक्ष कुणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यात पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असा खुलासा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहिला कोणतीही स्थगिती देण्यात सर्वोच्च न्यायालयाने नकार दिली आहे.
त्यामुळे आता उध्दव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला मात्र दुसरीकडे शिंदे गटाला यातून दिलासा मिळाला आहे. पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे आत्तापर्यंत ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली.