ब्रेकींग : शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात !

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे चोपडा येथील प्रचार सभा आटोपून भुसावळकडे येत असतांना त्यांच्या ताफ्यातीन दोन वाहनांचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी ३ मे रेाजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. परंतू दोनही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक असे की, रावेर लोकसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ आज चोपडा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी शरद पवार हे उपस्थित होते. दुपारी सभा आटोपल्यानंतर त्यांचा शरद पवार यांचा ताफा भुसावळकडे रवाना झाला. त्यावेळी यावल तालुक्यातील किनगाव जवळ शरद पवार यांच्या मागे आलेल्या (एमएच १५ सीएम ९२७६) आणि (एमएच ४८ एस ५८९५) दोन वाहनाचा अपघात घडला आहे. या अपघातात दोनही वाहनाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.

Protected Content