Home क्राईम Breaking News: जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, रुग्णालयात उपचारार्थ दाखल

Breaking News: जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, रुग्णालयात उपचारार्थ दाखल

0
219

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील राज शाळेजवळ येथे जुन्या वादातून एका तरुणावर तीन 4 जणांनी कोयता आणि चाकूने गंभीर वार करून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हर्षल कुणाल पाटील वय १८, रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, हर्षल पाटील हा त्याच्या मित्रांसोबत रामेश्वर कॉलनी येथील राज शाळेजवळ रविवारी 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बसलेले होते. त्यावेळी जुन्या वादातून हर्षल पाटील यांच्या डोक्यावर लोखंडे कोयता आणि चाकू आणि रॉडने वार करून त्याला जखमी केले दरम्यान या घटनेमध्ये हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला तातडीने खाजगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणाच्या डोक्याला गंभीर वार केल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनांसाठी धाव घेतली. दरम्यान याबाबत अद्याप पर्यंत पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound