ब्रेकिंग न्यूज : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून; पतीस अटक

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीला आली आहे. विशेष म्हणजे पत्नीचा खून करून पती हा स्वतःहून रावेर पोलीस ठाण्यात हजर झाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आशा संतोष तायडे (वय ३८ रा.आभोडा ता. रावेर) अशा मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील आभोडा या गावात आशा तायडे या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. शेती व मजुरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान त्यांचे पती संतोष तायडे याने गळा दाबून पत्नीचा खून केला. ही घटना सोमवारी ३१ मार्चची सकाळी ६ वाजता समोर आली आहे. विशेष म्हणजे पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी पती हा स्वतःहून रावेर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या घटनेमुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. खळबळ उडाली असून गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे.

<p>Protected Content</p>