Home Cities एरंडोल ब्रेकिंग न्यूज : भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू; पती व तीन मुले गंभीर...

ब्रेकिंग न्यूज : भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू; पती व तीन मुले गंभीर जखमी

0
169

एरंडोल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिर्डीहून मुक्ताईनगरला परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, पती व तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना एरंडोल ते धरणगाव दरम्यानच्या पिंपळकोठा गावाजवळ घडला आहे. मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. असून जखमींवर उपचार सुरू आहेत या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील (वय 46) हे आपल्या पत्नी रुपाली पाटील (वय 40) आणि तीन मुलांसह शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12.30 वाजता मुक्ताईनगरकडे परतताना, एरंडोल ते जळगाव दरम्यान नॅशनल हायवेवर युपी ढाब्यासमोर अचानक आलेल्या कंटेनरने त्यांची मारुती स्विफ्ट कार (MH-19-CQ-7009) ने जात असताना कंटेनर क्रमांक (WB-23-F9472) हा रस्त्यावर अचानक आल्याने पाटील यांची कार त्याला मागून धडकली. धडकेनंतर कार रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात राजेश पाटील, त्यांच्या पत्नी रुपाली पाटील आणि तीन मुले—खुशी, स्वरा आणि गुरु हे सर्व जण गंभीर जखमी झाले.

पत्नीचा जागीच मृत्यू, मुले रुग्णालयात दाखल
अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली पाटील यांना मृत घोषित केले. त्याचवेळी तीन मुलांना एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात?
फिर्यादी राजेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार, कंटेनरचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक वाहन रस्त्यावर आणल्यामुळे अपघात झाला. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूला आणि मुलांच्या दुखापतीस कंटेनरचालकच जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
या घटनेनंतर राजेश पाटील यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, कंटेनर चालकाविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महामार्गावरील अपघात वाढले
या अपघातामुळे एरंडोल-जळगाव महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर बेशिस्त वाहतूक, भरधाव वेगाने जाणारी वाहने आणि नियमांकडे दुर्लक्ष करणारे चालक यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे.


Protected Content

Play sound