ब्रेकिंग न्यूज : डंपर आणि दुचाकीच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार: फुफनगरी फाट्याजवळील घटना

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील फुपनगरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या डंपरला दुचाकी वर आलेल्या दोघांनी जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर असलेल्या घार्डी येथील दोन जणांचा जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, पंकज शंकर कोळी (वय-२६) आणि अमोल आनंदा कोळी (वय-२७, दोन्ही रा. घार्डी ता. जळगाव) हे दोघे मित्र कामावरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ एव्ही ३४४६)ने घरी घार्डी येथे जात असताना जळगाव तालुक्यातील फुफनगरी फाट्याजवळ दोघांच्या दुचाकीचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या डंपर (एमएच १९ झेड ८०६७)ला त्यांची दुचाकी धडकली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पंकज आणि अमोल या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. तसेच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content