अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात एका तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या तरूणाचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार चिंधू चौधरी रा.मारवड ता.अमळनेर ह.मु. प्रताप मील, अमळनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील प्रताप मील परिसरात तुषार चौधरी हा तरूण वास्तव्याला होता. गुरूवारी ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार हा बाहेर गेलेला होता. त्यानुसार तो घरी परतला नाही. दरम्यान, शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तुषारचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी पारिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोउनि बागुल, पोहेकॉ कैलास शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा आढळून आल्याने त्यांचा खून केला असवा असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या मृतदेहाजवळच दारूच्या बाटल्या पडलेल्या मिळून आल्या. या घटनेबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.