ब्रेकिंग न्यूज : शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

jalgaon Shivsena

मुंबई (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटले जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढणार, असे संकेत मिळत आहेत.

 

दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या सुकाणू समितीची (कोअर) बैठक सुरु आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे नेते उपस्थित आहेत. यावेळी शिवसेनेसोबतच्या युतीचा निर्णयही होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेने हा निर्णय होण्यापूर्वीच आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत. एवढेच नव्हे तर, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचेही कळते. त्यामुळे शिवसेना भाजपशी युती न करता स्वबळावर लढणार, असे संकेत मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या यादीत संजय घाटगे (कागल), संग्रामसिंह कुपेकर (चंदगड), राजेश क्षीरसागर(कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), डॉ. सुजित मिचणेकर (हातकणंगले), सत्यजीत पाटील (शाहुवाडी), प्रकाश आबिटकर (राधानगरी), उल्हास पाटील (शिरोळ) यांचा समावेश आहे.

Protected Content