मुंबई (वृत्तसंस्था)सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्यास भाजप इच्छुक आहे का ?, अशी विचारणा राज्यपालांकडून भाजपला झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेबाबत विचारणा केली आहे. विधानसभेची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक असताना राज्यपालांकडून ही विचारणा झाल्यामुळे राजकीय वर्तुळातील हालचाली तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापनेचा दावा करेल का? भाजप सरकार सभागृहात बहुमत सिद्ध करेल का? याप्रमाणे सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी त्यांना विचारणा सत्तास्थापनेची विचारणा केली आहे.