Home Cities भुसावळ ब्रेकींग न्यूज – शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले : आ. चंद्रकांत पाटील पोलिसांच्या ताब्यात...

ब्रेकींग न्यूज – शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले : आ. चंद्रकांत पाटील पोलिसांच्या ताब्यात !


मुक्ताईनगर/भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खामखेडा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील भूमी अधिग्रहणातील घोळाबाबत शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले असून यात आज आमदार चंद्रकांत पाटील यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सध्या इंदूर ते हैदराबाद महामार्गाचे काम सुरू असून यात खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला न मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. काही दिवसांपूव तर सदर कामाच्या ठेकेदाराने दादागिरी करत शेतकऱ्यांच्या केळीमध्ये जेसीबी घालून ते पीक जमीनदोस्त करत काम सुरू केले. यामुळे शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. याप्रसंगी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली होती. यानंतर देखील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच होते.

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. आज या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यानंतर वातावरण चिघळले. यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांसह आमदार चंद्रकांत पाटील यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ताब्यात घेऊन भुसावळ तालुका पोलीस स्थानकात आणले जात असल्याचे वृत्त आहे.


Protected Content

Play sound