चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथील रहिवाशी असलेला ४० वर्षीय तरूणाचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावरील पीर पाखर बाबा दर्गाजवळ आढळून आला आहे. खूना मागील नेमके कारण समोर आलेले नाही. जगदीश फिंगऱ्या बारेला वय ४० रा. अडावद ता.चोपडा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, जगदीश बारेला हाअडावद गावातील हतनूरच्या उजव्या कालव्यावरील डाव्या चारीवर झोपडी करून पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे यांच्यासोबत वास्तव्याला होता. रविवारी १ ऑगसट रोजी पहाटे अंकलेश्र्वर – बुऱ्हाणपूर महामार्गावर पिर पाखर बाबाच्या दर्ग्याजवळ जगदीश फिंगऱ्या बारेला यांचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला. त्याच्या मृतदेहाजवळ (एमपी ४६ एमएल ६८८९) क्रमांकाची दुचाकी आढळून आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनस्थळी धाव घेतली. गुन्हे शोधासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र जवळपास व दर्ग्याच्या परिसराच्या पलीकडे ते जाऊ शकले नाही. मृतदेहाच्या प्राथमिक स्थितीवरून त्याला झालेला जबर मारहाण करूनच त्याचा खून करण्यात आला असल्याचे समजते. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याप्रसंगी श्वान जंजिरा सोबत ठसे तज्ञ सहायक पोलीस निरीक्षक फड , स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनरीक्षक गणेश वाघमारे, अनिल जाधव यांचे पथक श्वान जंजीर सोबत हवालदार निलेश झोपे, पोलीस नाईक प्रशांत कंखरे हे उपस्थित होते. घटनेचे गांभीर्य पाहता चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनरीक्षक राजू थोरात, हवालदार भरत नाईक, दिनेश चव्हाण, गृह रक्षक दलाचे जवान संजय पवार, अमोल हिवाळे, चंदू कोळी, मनोज महाजन, किरण महाजन यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.