ब्रेकिंग न्यूज : शिवसेनेला कॉंग्रेस पाठींबा देण्याच्या तयारीत

shivsena and congress

जयपूर (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. जयपूर येथील बैठकीत काँग्रेस नेते आणि आमदारांच्या बैठकीत शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला असल्याचे कळते. दरम्यान, काँग्रेसने अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती जारी केलेली नाही.

 

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे ही आग्रही मागणी लावून धरली. काँगेसच्या ४० आमदारांनी एकमातांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

काँग्रेसला आपले आमदार फुटण्याची भीती होती. त्यामुळेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इतर 40 पेक्षा अधिक आमदार जयपूरला पोहोचले. याच ठिकाणी काँग्रेस नेते आणि आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील सरकार स्थापनेच्या हालचालींवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. तसेच भाजपला कसे सत्तेपासून दूर करता येईल यावर भर देण्यात आला. त्यामुळे, शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देऊन राष्ट्रपती राजवटीची नामुष्की टाळावी असा निर्णय काँग्रेसने घेतल्याची चर्चा आहे.

Protected Content