जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हावासियांना आज सकाळपासून लोकसभा निवडणूकीच्या निकालाची प्रचंड उत्सुकता लागून होती. अगदी पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे आणि स्मिताताई वाघ या आघाडीवर राहिल्या आहेत. शेवटच्या वृत्तानुसार लोकसभेच्या दोनही जागावंर महायुतीचे उमेदवारांची विजयाकडे वाटचाल झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान महायुतीचे दोनही उमेदवारांची विजयाची चिन्हे दिसू लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी जी.एम. फाऊंडेशन येथे फटाके फोडून जल्लोष केला आहे.
१३ मे रोजी राज्यात चौथ्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर एक्झीट पोलचा निकाला महायुतीच्या बाजूने असल्याचे कल दिसून आला. दरम्यान आज सकाळ पासून लोकसभा निवडणूकीच्या निकाल जाहीर टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहे. आता दुपारी ३ व्या १९ व्या फेरीनुसार मिळालेल्या महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे 1,59,608 मतांनी आघाडीवर त्यांना एकूण 4,01,742 इतके मत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील 2,42,134 यांना अनुक्रमे इतके मत मिळाले असून रक्षा खडसे आघाडीवर असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदार संघातून स्मिताताई वाघ ह्या 2,09,216 मतांनी आघाडीवर असून त्यांना 5,29,301 मते मिळाली आहे तर करण पवार यांना 3,20,085 इतकी मते मिळाली. या निकालावरून महायुतीचे दोन्ही उमेदवारांची विजयाकडे वाटचाल असल्याचे पहायला मिळाले आहे.
दरम्यान, मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सकाळी गर्दी केली होती. त्यानंतर रक्षा खडसे आणि स्मिताताई वाघ यांना प्रचंड प्रमाणावर आघाडी असल्याची चिन्हे दिसून आल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट भाजपा संपर्क कार्यालयात जी.एम. फाऊंडेशन येथे ढोलताश्यांच्या गजरात जल्लोष केल्याचे पहायला मिळाले.