ब्रेकींग : नाथभाऊंनी घेतली अमित शहांची भेट : भाजपमधील प्रवेशाची उत्सुकता शिगेला !

नवी दिल्ली – वृत्तसेवा । आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपात प्रवेशाबाबतचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच नाथाभाऊ भाजपात प्रवेश करणार असल्याची उत्सुकतला समर्थकांना लागली आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री खा. रक्षाताई खडसे या देखील उपस्थित होत्या.

या संदर्भातील माहिती असे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. एकनाथराव खडसे यांचे भारतीय जनता पक्षात प्रवेशाची प्रयत्न सुरू आहे. त्यांनी आपण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली असून लवकरच पक्षात प्रवेश होणार असल्याचे म्हटले आहे. तथापि लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा झाला नाही. यानंतर त्यांचा प्रवेश नेमका कधी होणार ? याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला होता. विशेष बाब म्हणजे मध्यंतरी त्यांनी आपण पक्षात आधीच प्रवेश घेतलेला असून येत्या काही दिवसांमध्ये याची पुरावे जगासमोर मांडणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर त्यांची सुन खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली. त्यामुळे पक्ष प्रवेश सोहळा लवकर होणार असल्याची चर्चा सुरू होती.

यात दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षप्रवेशावरून नाथाभाऊंची खिल्ली देखील उडवली होती. या पार्श्वभूमीवर नाथाभाऊंचा प्रवेश कधी होणार याबाबत चर्चेला उधाण आले आहा. या सर्व घडामोडी घडत असताना आज सोशल मीडियामध्ये आमदार एकनाथराव खडसे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला असून या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार असल्याचे संकेत स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे नाथाभाऊ पुन्हा भाजपमध्ये झाल्यास उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी पक्षाची ताकद वाढणार आहे. आता त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त कधी लागतो, याकडे त्यांच्या नेत्यांसह समर्थकांचे, हितचिंतकांचे लक्ष लागले आहे.

Protected Content