ब्रेकिंग ! नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा दिला राजीनामा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. एनडीएने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या 8 जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. अशातच नरेंद्र मोदींनी आज ५ जून रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा मंजूर केला असून मोदी आतापासून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

५ जून रोजी आज भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊ शकतात. या काळात पंतप्रधान मोदी सरकार स्थापनेला पाठिंबा देणारे पत्र राष्ट्रपती मुर्मू यांना सुपूर्द करू शकतात.

7 जून रोजी दुपारी 2.30 वाजता संसद भवनात एनडीएच्या खासदारांची बैठक होण्याची शक्यत आहे. या बैठकीला एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. हा शपथविधी कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान होऊ शकतो.

Protected Content