जळगाव लाईव्ह टट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एमआयडीसी मधील मानराज सुझुकी शोरूम येथील सोलरच्या इलेक्ट्रिक पॅनलला बुधवारी 8 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर आगीमध्ये शोरूमचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर बुधवारी 8 जानेवारी रोजी सकाळी जळगाव विमानतळावर येत आहेत. नेमका त्याच मार्गावर असलेल्या मानराज सुझुकी कारच्या शोरूमच्या सोलर इलेक्ट्रिक पॅनलमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली आहे. आग लागल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आगीचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, शेवटचे वृत्त आधी आले, तेव्हा या आधी संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.