पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील पुजारी नगर भागात एका ५१ वर्षीय व्यक्तीला घराबाहेर बोलावून शिवीगाळ करत घरात घुसून मारहाण केल्याची घटना २८ जानेवारी रोजी घडली. विशेष म्हणजे या प्रकरणात एका पोलीस अंमलदाराचाही समावेश असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादी निलेशकुमार लक्ष्मणराव कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी अल्पेश सुभाष कुमावत (पोलीस अंमलदार, भडगाव पो.स्टे.) आणि योगेश चंद्रभान कुमावत यांनी फिर्यादीला घराबाहेर बोलावून मारहाण केली. फिर्यादी जीव वाचवण्यासाठी घरात पळाले असता आरोपींनी घरात अनधिकृतपणे प्रवेश करून त्यांचे डोके भिंतीवर आपटले. तसेच फिर्यादीच्या आईलाही जिवंत न सोडण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार अधिक तपास करत आहेत.




