जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दुध फेडरेशन रोडवरील राधाकृष्ण नगरात काही टवाळखोरांनी मध्यरात्री ६ ते ७ चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना रविवारी ३ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलीसांनी घटनस्थळी धाव घेवून पाहणी केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील दुध फेडरेशन रोडवरील राधाकृष्ण नगरात काही टवाळखोर तरूणांनी एअर गन किंवा टोच्या मदतीने अंगणात उभ्या असलेल्या ६ ते ७ चारचाकी वाहनाचे काचा फोडून नुकसान केल्याची घटना रविवारी ३ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. यात तुषार बाविस्कर यांची एमएच १९ सीआय ५६३८, ॲड. निलेश जाधव यांनी एमएच १९ ईए १७२० तर इतर वाहन क्रमांक एमएच १९ एइ १८३४, एमएच ०२ बीआर ४१३६, एमएच ०१ एएक्स ७७२१ यासह इतर वाहने असे एकुण ६ ते ७ वाहनाचे नुकसान झाले आहे. हा प्रकार घडल्यानंतर स्थानिक नागरीकांनी शहर पोलीसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी राधाकृष्ण नगरात धाव घेवून माहिती घेतली. दरम्यान घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.