मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुलीकडे भेटण्यासाठी आलेल्या पित्याला भरदार वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास रघुनाथ इंगळे वय-५३, रा. वाघळी ता.रावेर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
विकास इंगळे हे आपल्या परिवारासह वागडी गावात वास्तव्याला होते. दरम्यान त्यांची मुलगी मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे दिलेली आहे. दरम्यान २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विकास इंगळे हे मुलीला भेटण्यासाठी घोडसगाव येथे आलेले होते. दरम्यान सायंकाळी ६ वाजता ते गावात फिरून येतो, असे सांगून घरातून निघून गेले होते. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मुलीचे नातेवाईक आकाश भालेराव यांनी त्यांचे पती सागर वानखेडे यांना फोन करून सांगितले की, अज्ञात वाहनाच्या धडकेत तुमचे सासरे विकास इंगळे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानुसार मुलगी स्वप्नाली वानखेडे आणि त्यांचे जावई सागर वानखेडे हे मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केलेले होते. दरम्यान पित्याचा मृत्यू झाल्याचे पाहून मुलीने एकच हंबरडा पडल्याची दिसून आले, दरम्यान या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात पिकप वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.