जळगाव प्रतिनिधी । अखेर रावेरची जागा काँग्रेसला सुटली असून आज याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
गत अनेक दिवसांपासून रावेरच्या जागेबाबतचा तिढा आता सुटला आहे. आज ही जागा काँग्रेसला सोडण्यात आल्याचे घोषीत करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या ट्विटर अकाऊंटवरून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा नेमकी कोण लढविणार याबाबत गत अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात काथ्याकुट सुरू होता. यात अखेर आज ही जागा काँग्रेसला सोडण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, येथून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे तिकिट निश्चित मानले जात आहे.
दरम्यान, रावेरची जागा काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीने नेमकी कोणती लोकसभा वा विधानसभा जागांची अदलाबदली केली याबाबत अद्याप तरी माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील अमळनेर व जामनेर हे दोन अतिरिक्त विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. अर्थात याला काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
महाआघाडीच्या जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसचा रावेर मतदारसंघासाठी आग्रह होता. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून रावेर मतदारसंघ @INCIndia ला सोडण्यात येत असून जळगावची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल, असा निर्णय झाला आहे – @Jayant_R_Patil
— NCP (@NCPspeaks) March 29, 2019