भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळू वाहतुकीचा व्यवसाय करताना कारवाई न करण्यासाठी २ लाख ६० हजारांची मागणी करत तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची लाच घेताना भडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला जळगाव येथील लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. किरण रवींद्र पाटील वय-४१ रा. भडगाव असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे भडगाव शहरातील रहिवाशी आहे. त्यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. यापूर्वी तक्रारदारावर भडगाव पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतुकीबाबत दोन गुन्हे दाखल आहे. दरम्यान तक्रार यांना सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार किरण पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे २ लाख ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान याबाबत तक्रार यांनी जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. शुक्रवारी २६ जुलै रोजी दुपारी २ वाजता सापळा रचला. त्यावेळी असून पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील याने तक्रारदाराकडे २ लाख ६० हजारांची मागणी केली. व यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच घेतांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
यांनी केली कारवाई
पोलीस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोउपनि दिनेशसिंग पाटील, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी यांनी केली आहे.
पोलीसांचे आवाहन
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. असे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो जळगाव यांनी केले आहे.