ब्रेकींग : दोन हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस विभागातील वरिष्ठ लिपीकाला रंगेहात पकडले

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळे पोलीस दलातून सहायक पोलीस उपनिरीक्षकाला सेवानिवृत्तीचे राहिलेले बिले मंजूर करण्याच्या मोबदल्यात २ हजार रुपयांची लाचेची रक्कम घेणाऱ्या पोलीस विभागातील वरिष्ठ लिपिकाला धुळे येथील लाच लुचपत विभागाने कारवाई करत रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील वसंत गावित वय-४८ असे लाच घेणाऱ्या वरीष्ठ लिपीकाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे धुळे पोलीस दलातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून २०१९ मध्ये सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांची राहिलेली बिले मंजूर होऊन मिळावी. या मागणीसाठी १० जुलै २०२४ रोजी धुळे येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात अर्ज केला होता. त्यापैकी त्यांना १ लाख २९ हजार रुपयांची बिले त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. त्यानंतर तक्रारदार यांनी उर्वरित बिलासाठी धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखा विभागातील वरिष्ठ लिपिक सुनील गावित यांच्याकडे चौकशी केली. त्यामध्ये सुनील गावित यांनी बिलाचे काम करून देण्यासाठी कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने २ हजार रुपयांची लाचीची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी धुळे लाच लुचपत विभागात जावून याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी सापळा रचून पडताळणी केली असता संशयित आरोपी सुनील गावित यांनी २ हजार रुपयाची लाच स्वीकारतांना पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content