अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांधकाम मटेरीयलची वाहतूक करणाऱ्या ठेकेदार व्यावसायिकाचा डंपर आडवून ३० हजारांची लाचेची मागणी करत खासगी पंटरच्या माध्यमातून लाच स्विकारतांना हवालदारासह खासगी पंटरला धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण असे अटकेतील संशयितांची नावे आहेत.
सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील रहिवासी असलेले तक्रारदार यांचा बांधकाम मटेरीयलचा व्यवसाय आहे. अमळनेरचे हवालदार घनश्याम पवार यांनी रविवारी ७ जानेवारी रोजी तक्रारदार यांचा डंपर अडवत त्यांच्याकडे पोलीस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून ३० हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून केल्यानंतर धुळे एसीबीने ९ मंगळवारी रोजी लाचेबाबत पडताळणी केल्यानंतर हवालदार पवार यांनी ३० हजारांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने लागलीच याबाबत सापळा लावला असता खाजगी पंटर इम्रान खान याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे घनश्याम पवार सांगितल्यानंतर सुरूवातीला खाजगी पंटर व नंतर घनश्याम पवार यांना एसीबीने अटक केली.