ब्रेकींग : भरधाव डंपरने अल्पवयीन मुलाला उडविले; इतर तीन जण जखमी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा जागीच ठार झाला तर इतर तिन जण गंभीर जखमी झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ शनिवारी १५ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६.३० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात डंपर वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल अफजल काकर वय १५ रा. लोहारी ता. पाचोरा असे मयत झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्तमश अन्सार काकर वय २२ रा. लोहारी बुद्रुक ता. पाचोरा हा तरूण गावोगावी जावून भांडे विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी १५ जून रोजी सकाळी ११ वाजता अल्तमश काकर हा गावातील साहिल अफजल काकर याच्या सोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईई ७२०२) ने चाळीसगावकडून पाचोरा येथे येत असतांना चाळीसगाव तालुक्यातील वाडळी गावाजवळ अल्तमशच्या दुचाकीला ओव्हरटेक करत असतांना डंपर क्रमांक (एमएच १५ जेसी ६५७०) कट मारला. त्यामुळे दुचाकीवरी दोघेजण खाली पडले. यात साहिलच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर अल्तमश हा जखमी झाला. या अपघातात समोरून येणारी दुचाकीवरील अनोळखी पुरूष व महिला हे देखील जखमी झाले. अपघात झाल्यानंतर डंपर चालक हा वाहन घेवून पसार झाला होता. याप्रकरणी सायंकाळी साडेसहा वाजता अल्तमश काकर याने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जयेश पवार हे करीत आहे.

Protected Content