जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर ते शहापूर रोडवरील बेलफाट्याजवळ व्यवसायिकाचा रस्ता आडवून बॅगेत ठेवलेले १ लाख ९३ हजार ५०० रूपयांची रोकड अज्ञात तीन जणांना जबरीने हिसकावून चोरून नेल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश रतन पवार वय ३६ रा. शहापूर ता. जामनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यावसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास बॅगेतून १ लाख ९३ हजार ५०० रूपयांची रोकड घेवून निलेश पवार हे दुचाकीने घराकडे निघाले होते. त्यावेळी जामनेर ते शहापूर रोडवरील बेलफाट्या रस्त्यावर अज्ञात तीन जणांनी त्यांचा रस्ता आडविला. त्यांनी निलेश पवार यांना बेदम मारहाण करून त्यांच्या जवळील रोकड ठेवलेली पिशवी लांबविली. हा प्रकार घडल्यानंतर निलेश पाटील यांनी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहे.