मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले असतांनाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ४४ आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
ॠसविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणार्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील दोन्ही गटांमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. तर याचसोबत प्रत्यक्षात कोणत्या गटाकडे किती बळ ? याची चाचपणी देखील होत आहे. या अनुषंगाने आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. कारण आज दोन्ही गटांच्या महत्वाच्या बैठका होत असून यातून सर्व काही चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दोन्ही गटांच्या बैठका सुरू होण्याआधीच एक मोठी माहिती समोर आली असून या संदर्भात टिव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. यानुसार विधानसभेचे ४२ तर विधानपरिषदेचे २ अशा एकूण ४४ आमदारांचे अजित पवार यांना मिळाले असल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आलेला आहे. या संदर्भात आजच्या बैठकीत माहिती देण्यात येणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.