पुणे प्रतिनिधी । सर्वसामान्य जनतेकडून देखील (हातसडी) ब्राऊन राईसची मागणीत वाढ होत असल्याने, कंपनीने त्याचाच फायदा घेत बाजारामध्ये साधा तांदूळला अर्धवट उकडून (बॉईल) ब्राऊन राईसच्या नावाने विक्री करत आहे.
ब्राऊन राईस हा पोषक आणि अधिक आरोग्यदायी असल्यामुळे त्याची किमंत देखील दोन ते तीन पट्ट अधिक मिळत आहे. सामान्य लोकात आरोग्याप्रती जागरूकता कमालीची वाढली आहे. त्यामुळे एक विशिष्ट वर्ग ब्राऊन राईसला प्राधान्य देत आहे. परिणामी ब्राऊन राईसची मागणी सुद्धा वाढत आहे. याच संधीचा फायदा घेत काही कंपन्या चुकीचे पाऊल उचलत आहेत. साधा तांदूळला पॉलीश न करता, पुन्हा अर्धवट बॉईल प्रक्रिया करून तोच ब्राऊन राईस म्हणून ग्राहकांच्या माथी मारत आहेत. थोडे उकड्ल्यामुळे तांदळाच्या दाण्यांचा रंग बदलतो व त्याची त्वचाही गुळगुळीत न राहता ओबडधोबड बनते. परंतु सध्या काही कंपन्या ब्राऊन राईस विकतांना आमच्या तांदळामध्ये निम्नतम म्हणजे ८ ते १० जीआय असल्याचा दावा करतात. परंतू, तो खोटा असतो. अशा प्रकारे जाहिरात करून चुकीचा माल ग्राहकांना जास्त भावात विकतात. देशातील विविध क्षेत्रातील पाहणीनुसार आणि वेगवेगळ्या लॅबोरेटरीमधील तपासण्यांच्या अहवाला नुसार तांदळाचा जीआय ४० ते ५० पर्यंत आढळतो.