यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |यावल आगाराच्या वापी ते यावल या बदचा नवापूर गावाच्या जवळ बोरकीखाडी गावाजवळ ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाले असून प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर चालकाच्या प्रसंगावधानामुळे भीषण अपघात टळला आहे.
या संदर्भातील मिळालेली माहिती अशी यावलच्या आगारातुन वापी ( गुजरात )साठी गेलेली बस एम एच १८ बिएल३३७७ जाणारी बस ही आज परत येत होती. एसटी चालक के. जी. शिरसाडे ( यावल आगारात कार्यरत असलेले ) चालक यांच्या ताब्यातील वापी कडुन यावल साठी परतीच्या मार्गावर असलेली एसटी बस ही सकाळी ११ते १२ वाजेच्या दरम्यान दहिवेल जवळ असलेल्या बोरकीखाडी गावाजवळ अचानक गाडीचे ब्रेक निकामी झाले.
यावरून वाहनचालक के. जी. शिरसाडे यांनी प्रसंगावधानाने राखून सुमारे अर्धा किलोमिटर बसला चालवित बसवर नियंत्रण ठेवल्याने मोठा अपघात टाळुन मोठी जिवितहानी टाळण्यात यश मिळवले आहेे. मात्र या झालेल्या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले आहेत. या बस मध्ये चाळीसच्या जवळपास प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सदर एसटी बसचा अपघात झाल्याची आपल्याला प्राप्त झाली असुन अपघातस्थळी साक्री एसटी आगाराचे कर्मचारी दाखल झाल्याचे सांगितले. अपघात कसा झाला याची माहिती घेत आहे . अपघातात जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.