
पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण महासंघाने जोरदार विरोध केला आहे.
पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यास ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाचे सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही, भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे.