पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात किरकोळ कारणावरून गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीशी संपर्क तोडल्याने तिच्या घराबाहेर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात प्रेयसीची बहीण जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना मध्यरात्री गंजपेठेत घडली असून पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषी बागुल असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, प्रेयसीचा घटस्फोट झाला असून तिचे आणि ऋषी बागूल यांच्यात प्रेम संबंध आहेत. त्या दोघांमध्ये क्षृल्लक कारणावरुन वाद झाले होते. त्यामुळे प्रेयसीने ऋषीला फोन ब्लॉक केले होते आणि संपर्क तोडला होता. हे पाहून प्रियकर ऋषीला राग आला होता. त्यामुळे तो थेट प्रेयसीच्या घरी मध्यरात्री पोहचला असता त्यावेळी प्रेयसीची बहिण आणि ऋषीमध्ये वाद झाला.
त्यानंतर तिचे आणि आरोपी प्रेम संबंध होते. मात्र काही . त्यामुळे प्रेयसीने ऋषीता फोन ब्लॉक केला आणि त्याच्याोबत संपूर्ण संपर्क कमी केला. हे पाहून ऋषीला राग आला. ती भेटत नसल्याचं पाहून ऋषीचा राग अनावर झाला आणि तो रविवारी मध्यरात्री थेट प्रेयसीच्या घरी पोहचला. त्यावेळी प्रेयसीची बहिण आणि त्याचे वाद झाले. त्यामुळे त्याने थेट प्रेयसीच्या बहिणीवर बंदूक रोखली आणि तिच्यावर गोळीबार करुन तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी थेट पोलिसांची संपर्क साधून यासंबंधी माहिती दिली. हे ऐकताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी झालेल्या बहिणीला रूग्णालयात दाखल करण्यात आले.