
मुंबई-वृत्तसेवा | चाळीसगावचे माजी आमदार तथा जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश घेतला.

काही दिवसांपूर्वीच उन्मेष पाटील यांनी आपण शिवसेना-उबाठा पक्षाचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच केले होते. आज त्यांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खा. श्रीकांत शिंदे, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी उन्मेष पाटील यांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. यासोबत चाळीसगाव तालुक्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश घेतला. या माध्यमात्ूान उन्मेष पाटील यांचा भाजपमधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि तेथून शिवसेनेत असा प्रवास पूर्ण झाला आहे.



