Home क्राईम बळजबरीने दारू पाजून दोघांचा तरुणीवर बलात्कार

बळजबरीने दारू पाजून दोघांचा तरुणीवर बलात्कार


मौदा (वृत्तसेवा) तालुक्‍यातील महामार्ग क्रमांक सहावर मारोडी येथील तरुणीला बळजबरीने दारू पाजून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मयूर कुलरकर (रा. खराडा पुनर्वसन) हा प्रमुख आरोपी असून पोलिसांनी त्याला सहकार्य करणाऱ्या श्‍याम कातोरे (रा. मारोडी), राहुल कांबळी (रा. खराडा पुनर्वसन) व मारोडी येथील एका विधिसंघर्ष बालकाला अटक केली आहे.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

या संदर्भात अधिक असे की, शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पीडित तरुणीला श्‍याम कातोरे याने मोबाईलवर फोन करून रात्री ९ वाजताच्या सुमारास मारोडी बसस्थानकावर बोलावून घेतले. तिला रात्री दहाच्या सुमारास मारोडी येथील चरडे यांच्या पानठेल्याच्या मागे अंधारात आरोपी घेऊन गेले. तेथे मयूर व राहुल कांबळी यांनी जबरदस्तीने तिला दारू पाजली. तरुणी दारूच्या नशेत असल्याचा फायदा घेऊन मयूर कुलरकर याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपींनी तिला मारोडी रोडच्या पुलावर सोडून दिले. तिने घरी येऊन घडलेला प्रकार आई व भावाला सांगितला. आई आजारी असल्याने एकटीच पोलिस ठाण्यात ती तक्रार देण्यास गेली. मौदा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound