
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तांबापुरा भागात पैशाच्या किरकोळ वादावरून तिघांनी एकाला बेदम मारहाण करत चाकूने वार केल्याची घटना 18 जून रोजी रात्री घडली होती. या प्रकरणातील दोघं संशयितांना आज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेहान खान रशीद खान (वय 26 तांबापुरा) याला संशयित आरोपी शोएब उर्फ रफत शेख सलीम शेख (वय 18), अमन मेहबूब तडवी (वय 18) आणि बाबा (पुर्ण नाव माहीत नाही, तिन्ही रा. बिलाल चौक तांबापुरा) यांनी पैशाच्या कारणावरून रेहानला बेदम मारहाण केली होती. यातील शोएबने लोखंडी चाकू काढून रेहानच्या कंबरेच्या उजव्या भागात वार केले होते. त्यात रेहान गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. रेहनच्या फिर्यादीवरून तिघा आरोपींविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला . यातील शोएब उर्फ रफत शेख आणि अमन तडवी याला 23 जून रोजी रात्री अटक केले तर बाबा हा अद्यापपर्यंत फरार आहे.