जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील भादली येथे घडली. याप्रकरणी दोन जणांवर नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भादली येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून पतीसोबत गल्लीतील मनोज सुरेश सपकाळे याने दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करत असतांना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय विवाहितेचा अश्लिल शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना . तर मनोजची आईने शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून दोघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शांताराम तळेले करीत आहे.