यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील बोरखेडा येथे ग्रामपंचायतच्या वतीने आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे यांच्यासह सरपंच कलीमा तडवी , उपसरपंच इकबाल तडवी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आश्रय फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने गावात विविध जातीच्या सुमारे १०० वृक्षांच्या वृक्षरोपणाची सुरुवात करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील बोरखेडा या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावात ग्रामपंचायतच्या सरपंच अकीला जहाँगीर तडवी ,उपसरपंच इकबाल बाबू तडवी यांच्या पुढाकाराने यावलचे युवा समाजसेवक तथा विविध सामाजिक कार्यात अग्रस्थानी असलेल्या आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांच्या हस्ते व आदीच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा जवळ व गावाच्या परिसरात विविध जातीच्या सुमारे १०० वृक्षांचे वृक्षारोपणाची सुरूवात करण्यात आली आहे. या वृक्षांच्या संगोपणाची जबाबदारी ही प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी बोरखेडा ग्रामपंचायत सदस्य लुकमान मिरखा तडवी, सपना हसन तडवी, आरिफा जहाँगिर तडवी, बेगम सायबु तडवी, अलीशान अरमान तडवी, हसन समशेर तडवी यांच्यासह मोठया संख्येत ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी उपसरपंच इकबाल तडवी यांनी डॉ. कुंदन फेगडे यांचे ग्रामपंचायतच्या वतीने विशेष आभार मानले.