दमिश्क (वृत्तसंस्था) सिरियामधील अजाज शहरातील एका मशिदीबाहेर इफ्तार पार्टीच्या वेळी स्फोटकांनी भरलेली कार उडवून देण्यात आल्याने 14 जण ठार झाले आहेत. तर 28 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अजाज शहर आजही तुर्की समर्थित सिरियाई विद्रोह्यांच्या ताब्यात आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाहीय. दरम्यान, रविवारी इस्त्रायलकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यातही 10 जण ठार झाले होते. सिरियाने इस्त्रायलवर दोन रॉकेट डागल्यानंतर इस्त्रायलने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. या हल्ल्यात सिरियाचे 5 नागरिक आणि 5 सैनिक ठार झाले होते.