Home राज्य बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन



मुंबई (वृत्तसंस्था) राजश्री फिल्मचे संस्थापक आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे आज सकाळी निधन झाले. ते प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे वडिल होत.

मुंबईतील सर हरकिसनदास रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी सुधा बडजात्या आणि मुलगा सूरज बडजात्या असा परिवार आहे. राजकुमार यांच्या राजश्री प्रॉडक्शनने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांची निर्मिती केली. १९७२ साली आलेला पिया का घर, १९९४ मध्ये गाजलेला हम आपके है कौन, १९९९ चा हम साथ साथ है, असे अनेक चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने दिलेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound