Home क्राईम जामनेरात बोगस मतदारांना पकडले, पोलिसांना निवेदन सादर !

जामनेरात बोगस मतदारांना पकडले, पोलिसांना निवेदन सादर !


जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवार, २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना, प्रभाग क्रमांक १० मध्ये बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणासह एका मुलीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडले आहे. दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया राबविण्यात येत आहे.

रोशन विनोद चौधरी (रा. पहूर कसबे) हा तरुण बोगस मतदान करताना राष्ट्रवादीचे उमेदवार आकाश उर्फ पवन बंडे यांनी त्याला रंगेहात पकडले आणि तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन केले. याव्यतिरिक्त, एका मुलीलाही दुसऱ्या मुलीच्या नावाने बोगस आधार कार्ड बनवून मतदान करताना पकडण्यात आले. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्यांनी जामनेर पोलिसांना दुपारी दोन वाजता एक निवेदन सादर केले. तालुका अध्यक्ष किशोर पाटील यांनी या निवेदनातून मागणी केली आहे की, लोकशाहीच्या या प्रक्रियेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोगस मतदान करणारे तरुण आणि मुलीवर तातडीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा.


Protected Content

Play sound