Home क्राईम बोगस कॉल सेंटर प्रकरण : माजी महापौरांसह इतरांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

बोगस कॉल सेंटर प्रकरण : माजी महापौरांसह इतरांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
310

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मुमराबाद शिवारातील माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या एल.के. फॉर्म येथे बोगस कॉल सेंटरच्या नावाखाली परदेशातील लोकांना फोन करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोडीचा पर्दाफाश केला आहे. रविवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता छापा टाकला आहे. या प्रकरणात अटक केलेल्या सात जणांना सोमवारी २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील ममुराबाद शिवारातील एल के फार्म हाऊस येथे बोगस कॉल सेंटर सुरू असून या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका यु एस आणि कॅनडा येथील नागरिकांना फोन करून ॲमेझॉन कस्टमर केअर असल्याचे सांगून अनेकांची लाखो रुपयांमध्ये फसवणूक करत असल्याचे गोपनीय माहिती आपण पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांना मिळाले होते. त्यानुसार त्यांनी पथकाला तयार करून स्वतः पथकासह रविवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता एल.के. फार्म हाऊस येथे छापा टाकला. या ठिकाणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात करण्यात आली. यामध्ये देशी विदेशी लोकांशी संपर्क साधून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह तेथे काम करणाऱ्या इतर सहा जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी या ठिकाणी ३१ लॅपटॉप, सात मोबाईल, एक फ्रिज, काही डेबिट कार्ड तसेच दोन हुक्का मारण्याचा सेट जप्त करण्यात आला आहेह. विदेशातील लोकांना कॉल करून वेगवेगळ्या मार्गाने तो पैसा भारतात आणत असल्याचा प्रकार निष्पन्न झाला.

या संदर्भात रात्री उशिरा ११ वाजता सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा बेग हिसाबेक मिर्झा यांनी फिरण्यात दिली त्यानुसार राकेश चंदू आगारिया रा. वाघ नगर, जळगाव, ललित कोल्हे रा. कोल्हे नगर, नरेंद्र चंदु आगारीया रा. वाघ नगर, आदिल सैय्यद निशास अहमद सैय्यद रा. मालाड, मुंबई, इम्रान अकबर खान रा. कांदीवली, मुंबई, अकबर (पुर्ण नाव माहित नाही), ऋषी (पुर्ण नाव माहित नाही), मोहम्मद जिशान नुरी मोहम्मद नुर आलम (वय-१९), शाहबाज आलम मोहम्मद शाहबउद्दीन वय २५, साकीब आलम शहाबउद्दीन वय १९, मोहम्मद हाशिर मोहम्मद राशिद वय १९, चौघे राहणार रा. हावडा, वेस्ट बंगाल या ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान अटक केलेल्या सात जणांना सोमवारी २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


Protected Content

Play sound