Home धर्म-समाज बोदवड न.पं.नवनिर्वाचित नगरसेवकांचा माध्यमिक शिक्षक सेनेतर्फे सत्कार

बोदवड न.पं.नवनिर्वाचित नगरसेवकांचा माध्यमिक शिक्षक सेनेतर्फे सत्कार

0
37

बोदवड प्रतिनिधी । येथील नगरपंचायत नवनिर्वाचित नगरसेवकांचा माध्यमिक शिक्षक सेनेतर्फे सन्मानपत्र, भगवी शाल व फुलांचा गुच्छ देवून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

तसेच आपण  २०२२ ते २०२७ या कालावधीत  बोदवड नगरवासियांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांतिकारी विचारांनी तेजोमय होवोत, अशी आई भवानी चरणी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्यात.

यावेळी रेखा गायकवाड, कडुसिंग पाटील, योगिता खेवलकर, सईदाबी बागवान, विजय बडगुजर, पूजा जैन, पूजा पारधी, एकताबी शेख, आनंदा पाटील, मनीषा बडगुजर, बेबीबाई चव्हाण, शारदा बोरसे,  सईद बागवान,  शेख अल्ताफ, शाह मुजफ्फर शाह, बेबीबाई माळी आणि मीरा माळी या सर्व प्रभाग निहाय नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माध्यमिक शिक्षक सेना जिल्हा कार्याध्यक्ष गोविंदा पाटील, जिल्हा संघटक प्रदिपजी हिरोळे, शिक्षक सेनेचे ता.अध्यक्ष संदीप तायडे, उपाध्यक्ष योगेश्वर बाविस्कर, प्रभाग दोनचे शाखा प्रमुख रोहित पांडे, उपाध्यक्ष गिरीश पाटील शिवम पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound