बोदवड (प्रतिनिधी) । तालुक्यातील धोनखेडा येथील वयोवृध्द महिलेचे नाडगाव रस्त्यावर पैसे पडले. त्यावेळी कृषी केंद्रावर काम करणाऱ्या कामगाराने प्रमाणिकपणा दाखवत सापडलेले पैसे परत केले. कामागाराच्या प्रामाणिपणामुळे सर्वत्र कौतूक होत आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील धोनखेडा येथील आजीबाई लिलाबाई शामराव सुरवाडे ह्या नाडगाव रोडवरील दुकानांमध्ये बि बियाण्याचे भाव पाहून दवाखान्याकडे जात असताना त्यांचे पैसे रस्त्यात पडले. आपले 500 रूपयांच्या आठ नोटांचे बंडल गहाळ झाल्याचे आजीबाईंना दवाखान्यात गेल्यावर लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ज्या रस्त्याने आल्या होत्या त्याच रस्त्याने पैसे कुठे पडलेले दिसतात का? हे पाहत जात होत्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एकदम दु:ख दिसून येत होते. पै पै जमा करून जमविले पैसे हरविल्याने त्यांच्या डोळ्यातुन अश्रू ओघोळत होते. जिजाऊ प्लायवूडचा कामगार सागर वाघदारे याने आजी काय झाले ? अशी विचारणा केली असता आजीने त्यांचे पैसे हरविले असल्याचे सांगितले. सागरने आजी नोटा कशा होत्या चौकशी अशी चौकशी केली. आजीने सांगितले पाचशे रुपयाच्या आठ हजार रुपयांच्या नोटा होत्या. नंतर सागर वागदारे मला पैसे सापडले आहे. आजीचा नाराज चेहरा एकदम फुलून गेला लगेच सागरने आप्पा पाटील, आनंदा वाघ यांच्या साक्षीने आजींना पैसे परत दिले. सागरच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.