Home Cities बोदवड बोदवड तालुक्यात खासदार रक्षाताई खडसे यांचा प्रचार

बोदवड तालुक्यात खासदार रक्षाताई खडसे यांचा प्रचार

0
62

WhatsApp Image 2019 04 15 at 2.00.54 PM

बोदवड (प्रतिनिधी ) भाजप, शिवसेना, आरपीआय(आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना या महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांचा प्रचार बोदवड तालुक्यातील शिरसाळा, शेलवड, येवती या गावात करण्यात आला.

 

बोदवड ,मुक्ताईनगर ,जामनेर , मलकापूर ,मोताळा तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाणी मिळावे या उदात्त हेतूने माजी पाटबंधारे महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे  यांची संकल्पना असलेली त्यांनी मंजूर केलेली  ‘बोदवड उपसा सिंचन  योजनेमधील टप्पा क्रमांक 1 मधील जुनोने आमदगाव धरणाचे काम पूर्णत्वास येत असुन यामुळे बोदवड तालुका सुजलाम सुफलाम होईल असा मला विश्वास आहे.  तसेच तालुक्यातील 14 गावामध्ये राष्ट्रीय रुर्बन मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या जळगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे 14 गावे आदर्श बनणार आहेत. असे प्रतिपादन रक्षाताई खडसे यांनी केले.याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष आनंदाभाऊ पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोदभाऊ पाडकर,भाजप जिल्हा चिटणीस कैलास भाउ चौधरी, तालुकाध्यक्ष भागवत टिकारे,  पंस सभापती गणेश पाटील, जिप सदस्य भानुदास गुरचळ, जिप सदस्य वर्षाताई रामदास पाटील, पंस उपसभापती दीपाली ताई राणे, माजी तालुकाध्यक्ष अनिल पाटील,  कुऱ्हा हरदो सरपंच भगवान महाले, उपसरपंच मुकुंद शेळके, मनूर बु सरपंच नर्मदाबाई ढोले, उपसरपंच राजेंद्र शेळके, अर्चनाताई खिलवाडे, प्रभाकर शेळके, विजय खिलवाडे, एकनाथ खिलवाडे, देवराम शेळके, संतोष देवरे, महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound