जळगाव प्रतिनिधी । बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणार्या प्रेम प्रकाश कोळी (वय २०, रा. बोदवड) या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पतकाने अटक केली आहे.
प्रेम कोळी याने ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान बोदवड शहरातील अमित बालिकसन चांडक यांच्या घरातील १ लाख ५५ हजार रुपये रोख व ६ हजार रुपयांचे चांदीचे कडे चोरुन नेले होते. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, अशोक महाजन, दीपक पाटील, किरण धनगर, प्रमादे लाडवंतारी, मुरलीधर बारी यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून प्रेम कोळी याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.