बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भानखेडा येथील ग्रामसेवकाने दप्तर सुपुर्द करण्यास टाळाटाळ केल्यामुळे विकासकामांना अडथळा निर्माण होत आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील भानखेडा या गावाचे ग्रामपंचायतचे दप्तर ग्रामसेवक करवते यांनी २०२२ पर्यंत म्हणजे अद्याप पर्यंत न दिल्यामुळे गावाचे विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप सरपंच अनिल मोरे यांनी केला आहे.
खरं तर भानखेडा ग्रामपंचायतचे इलेक्शन होऊन दोन वर्ष झालेले आहेत. २०२० च्या आधी या ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक म्हणून करवते होते. त्यांनी अनेक कामांमध्ये घोटाळा केला असल्यामुळेच अद्याप पर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचे दप्तर नवीन ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांना दिलेले नाही असे सरपंच मोरे म्हणाले.
दरम्यान, गावाचा विकास काम थांबू नये. म्हणून ग्रामसेवक व सरपंच अनिल मोरे यांनी २०२० पासून त्यांचे नवीन दप्तर तयार केलेले आहेत. परंतु २०२० च्या आधीचा दप्तर ग्रामसेवक करवते यांच्याकडे असल्यामुळे कोणकोणते काम मंजूर झालेले आहेत. प्रस्तावित काम कोण कोणते होते आणि कोणत्या योजना नुसार किती पैसे आले होते आणि कोणत्या गोष्टीसाठी खर्च करण्यात आले होते. याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे ग्रामसेवक करवते यांनी त्वरीत दप्तर जमा करावे अन्यथा गटविकास अधिकारी यांनी संबंधित ग्रामसेवक करवते यांच्या वर कलम १७९ नुसार कारवाई करून दप्तर ताब्यात घ्यावे अशी मागणी सरपंचांनी केली आहे.
गटविकास अधिकारी हे कर्मचार्यांना व ग्रामसेवकांना पाठीशी घालतात.त्यामुळे कर्मचार्यांना फावते अशी चर्चा बोदवड तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे. यामुळे संबंधीत ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच अनिल मोरे यांनी केली आहे.