बोदवड प्रतिनिधी | बोदवड नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठीचे आरक्षण आज काढण्यात आले असून यामुळे काही इच्छुकांचा हिरमोड झाला असला तर काहींना मात्र अनुकुल आरक्षण निघाल्याचे दिसून आले आहे.
बोदवड येथील नगरपंचायतीचे आरक्षण आज दुपारी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात काढण्यात आले. प्राधिकृत अधिकारी तथा भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी १७ प्रभागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण खालीलप्रमाणे आहे.
प्रभाग निघालेले आरक्षण
क्रमांक १ सर्वसाधारण महिला
क्रमांक २ नागरिकांचा मागास प्रवर्ग
क्रमांक ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क्रमांक ४ सर्वसाधारण महिला
क्रमांक ५ सर्वसाधारण
क्रमांक ६ सर्वसाधारण महिला
क्रमांक ७ अनुसूचित जमाती
क्रमांक ८ अनुसूचित जाती
क्रमांक ९ सर्वसाधारण
क्रमांक १० सर्वसाधारण महिला
क्रमांक ११ सर्वसाधारण महिला
क्रमांक १२ सर्वसाधारण महिला
क्रमांक १३ सर्वसाधारण
क्रमांक १४ सर्वसाधारण
क्रमांक १५ नागरिकांचा मागास प्रवर्ग
क्रमांक १६ सर्वसाधारण महिला
क्रमांक १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
दरम्यान, आरक्षण निघाल्यामुळे आता येथील रणधुमाळीस खर्या अर्थाने प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजच्या आरक्षणात काही जणांचे हक्काचे प्रभाग हे आरक्षणीत झाल्याने त्यांच्या समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तर काही जणांना मात्र हक्काचा प्रभाग मिळाला आहे. सर्वसाधारण राखीव जागा कमी असल्यामुळे येथे तुल्यबळ उमेदवारांच्या लढती होण्याची शक्यता आहे.