बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बोदवड तहसील कार्यालयात जागतिक महिला दिन निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
येथे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत तहसीलदार योगेश टोपे यांच्या हस्ते लाभार्थी प्रतिभा पाटील, प्रभावती गायकवाड, रमेश पाटील, ज्योती चव्हाण, सिद्धार्थ उखर्डू इंगळे या प्रत्येक व्यक्तीला वीस हजार रुपये प्रमाणे धनादेश वाटप करण्यात नवीन रेशन कार्ड बाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमा ठिकाणी तहसीलदार योगेश टोपे निवासी नायब तहसीलदार श्रीमती संध्या सूर्यवंशी, अ.का. भालेराव, महसूल सहाय्यक ए.जी.मुळे, संजय गांधी योजना ऑपरेटर राहुल पाटील व निवासी नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.