यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील तहसील कार्यालयासमोर निळे निशान या सामाजिक समस्या व प्रश्नासाठी लढा देणाऱ्या संघटनेने दोन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. यावल ग्रामीण रूग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी व अन्य इतर मागण्यांसाठी संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष विलास तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलींद सोनवणे, संजय तायडे, नानु बारेला, मांगीलाल भिलाला, अनुबाई भिलाला, मिनाबाई बारेला, प्रमोद पारधे, आकाश बिऱ्हाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व आदिवासी समाज बांधव व महिलांच्या उपस्थित ठीय्या आंदोलन करण्यात आले.
त्यानंतर आज १३ ऑगस्ट मंगळवार रोजी या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. या आंदोलनाची तात्काळ जिल्हा आरोग्य प्रशासनाचे डॉ. किरण पाटील यांनी तात्काळ दखल घेत यावलच्या ग्रामीण रूग्णालय करीता डॉ. अभिजीत सरोदे वस्त्री रोगतज्ञ डॉ. गायत्री बोंडे या वैद्यकीय अधिकारी यांची कायमस्वरूपी नेमणुक केल्याने व धुळेपाडा आदिवासी वस्तीव टेंभी कुरण या ग्रामस्थांच्या समस्यांसह काही प्रलंबीत मागण्या व प्रश्न सोडविण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने यावल तहसीलच्या संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार मनोज खारे यांनी लेखी आश्वासन दिल्याने यशस्वी आंदोलन मागे घेतले आहे.