भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळातील राष्ट्रीय महामार्गावरील ऑर्डनन्स फॅक्टरी गटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ५ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रविवारी ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ नजीकच्या ऑर्डनन्स फॅक्टरी गेटजवळून अनोळखी व्यक्ती हे पायी जात असतांना शनिवार ५ जुलै रोजी रात्री ११ वाजता अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दर्यापूर येथील पोलीस पाटील गिरीष पाटील यांनी वरणगाव पोलीसांना माहिती दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकावर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जैन हे करीत आहे.




